आदिवासी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा अन्यथा मतदानावर बहिष्कार

Kolhapur news
By -

     कोल्हापूर न्यूज नेटवर्क

धरणगाव:-  (जि.जळगाव) आदिवासी जमातीच्या ठोस आर्थिक विकासासाठी व आदिवासीना पारंपारिक व्यवसायातून बाहेर काढून सुशिक्षित आदिवासी तरुणांना नवउद्योजक बनवून आदिवासीना आर्थिकदृष्ट्या बलवान बनवायचे असेल तर, यापूर्वीची आदिवासी विकास महामंडळाची कर्ज मर्यादा लक्षात घेता आदिवासीना फक्त मतदाना पुरते वापरून घ्यायचे चालले असून, भविष्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ ,महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ या महामंडळांच्या धरतीवर आदिवासी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून आदिवासी तरुणांना 10 लाखापासून 50 लाखांपर्यंत दोन टक्के व्याज दराने उद्योग उभारण्यासाठी तरतूद करावी अन्यथा भविष्यात आदिवासी जनता मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जितेंद्र (आबा) चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
*जितेंद्र चव्हाण प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणाले की आदिवासी लोकप्रतिनिधी हे अल्पसंतुष्ट झाले असून त्यांनी राजकीय लाचारी पत्करल्यामुळे आदिवासी जमातीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.भविष्यात आदिवासींच्या पारंपरिक व्यवसायाला फाटा देत सदर महामंडळासाठी राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील यांना राज्यातील सामाजिक प्रश्नावर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली भेटणाऱ्या शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार ,धुळे, जळगाव ,नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यातून 25 प्रतिनिधी जाणार असल्याचे म्हटले आहे.

    
      जितेंद्र चव्हाण (आबा)
अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग पुरोगामी संघर्ष परिषद