शशिकांत उगलमुगले आदर्श गुरुदेव पुरस्काराने सन्मानित

Kolhapur news
By -



अणदूर / प्रतिनिधी - रघुनाथ दळवी

     सर्वोदय शैक्षणिक संस्था व गॅलेक्सी फौडेशन 
यांच्या वतीने  जिल्हास्तरीय आदर्श  गुरुदेव पुरस्काराने आश्रम शाळा पळसंबे
ता . गगनबावडा या प्राथमिक शाळेच्या विषय शिक्षक शशिकांत सर्जेराव उगलमुगले यांना  सन्मानित करण्यात आले आहे .
     त्यांनी आपल्या १६ वर्षाच्या सेवा कालकिर्दी
मध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यादानाच्या पवित्र कार्यामधून शिष्यवृत्ती ,  सांस्कृतिक , क्रिडा,
तसेच शाळेच्या भौतिक सुविधा , रंगरगोटी , शालेय स्तरावरील नाविण्यपूर्ण उपक्रम
 अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी  शाळेचा नावलौकिक वाढवला  विद्यार्थीप्रिय शिक्षक
म्हणून त्यांची ओळख आहे .
     या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षक आमदार जयंत आसगावकर , शिक्षण सभापती रसिका पाटील , जि प . सदस्य भगवान पाटील , गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ , माजी शिक्षण संचालक संपतराव गायकवाड , गोकुळचे संचालक बयाजी शेळके , संचालिका श्रुतिका काटकर , संस्थापक
 रफिक काझी यांच्या हस्ते शिल्ड, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .


शशिकांत सर्जेराव उगलमुगले