कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कुरुकली.कागल तालुक्यातील एक छोटेसे गांव .वेदगंगेच्या काठावर वसलेल्या आणि निपाणी राधानगरी रस्त्यालगत असलेल्या अनेक प्रगत गावांपैकी एक गांव .
पण याच गावात गेली अनेक वर्षे मातंग समाजाच्या मानवी हक्कांचे शोषण सुरू आहे .त्याचा अतिरेक झाल्याने या समाजातर्फे ग्रामसेवका च्या विरुद्ध थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालया समोरच उपोषण करायचा इशारा दिला आहे .
वीज ,पाणी आणि सार्वजनिक आरोग्य या सुविधा म्हणजे प्रत्येक नागरिकाचा हक्क असतो .
या हक्कांपासूनच इथला मातंग समाज अनेक वर्षे वंचित राहिला आहे .
खरं तर हे एक विकसित गांव आहे .ना .हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील या गावातले हे विषण्ण चित्र ताबडतोब बदलायला हवे .
दुधात पडलेल्या माशीला झटकून टाकावं तसं इथल्या मातंग समजाला वंचित ठेवलं आहे .
गावसेवेत हा समाज तसूभरही मागे नाही .पण तेथे पिण्याच्या पाण्याची अवस्था गेली दीड वर्षे'थेंब थेंब गळे 'अशी झाली आहे .कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.ऐन 'कोरोना 'काळात तर महिलांची तारांबळ उडाली होती .
हात धुवायलाही पाणी मिळेना .
पाणीपट्टी मात्र एक पैशाने कमी नाही.
वीज पुरवठयाची अवस्था अशीच दयनीय .अंधारात चाचपडत रात्रीचा मार्ग काढायचा ,त्यात जागोजागी डबकीच डबकी .त्यातून डासांचे साम्राज्य .
त्यामुळे नागरी आरोग्याची 'ऐसी तैशी'च. घरोघरी तापाचे पेशंट .
ग्रामसेवकाकडे तक्रारींचे अर्ज तरी किती द्यायचे .त्यांना सरळ केराची टोपली आणि त्यावर तंबाखूची पिचकारी .
हमरस्त्यावरच्या या सधन आणि विकसित गावातील मातंग समाजाला पंधरा वर्षे ग्रामपंचायतीत साधं प्रतिनिधित्वही मिळू नये ही बाब अशोभनीय आहे .
सुग्रास भोजनाच्या ताटात वाऱ्याने वहात आलेला केसांचा पुंजका पडला तर ते ताटच ओंगळ वाटत.
वसाहतीच्या सोयी सुविधाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य केल्याने या सुंदर गावाची अवस्था आता अशीच झाली आहे .
अत्यावश्यक गरजा वसाहतीला मिळणं हा मूलभूत हक्क आहे .
तो मिळत नाही म्हणूनच धुरीणांचे लक्ष वेधण्यासठी या समाजातील एक प्रमुख नागरिक प्रकाश सखाराम तिराळे दिनांक २५ मे २०२२ रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालना समोरच लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .
,प्रकाश तिराळे हे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारीही आहेत .
सामाजिक उत्थान कार्यात पत्रकार संघाचा पाठींबा नेहमीच पाठींबा राहिला आहे .
पत्रकार संघाच्या आंदोलना मुळेच निपाणी ते मुदाळं तिट्टा या हमरस्त्याच्या प्रलंबित कामाला गति आली आहे .
कुरुकली मातंग समाजाच्या उपोषणालाही नागरिकांचा उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे .
******************
