75 व्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजाराचा शैक्षणिक उठाव ...खडूळे ग्रामस्थांचा शाळेसाठी उपक्रम

Kolhapur news
By -



    कोल्हापूर न्यूज  / गगनबावडा  प्रतिनिधी -
 रघुनाथ दळवी

 खडूळे  ता.गगनबावडा येथील प्राथमिक शाळेत
75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ.पुनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 विद्यार्थ्यांच्या सुमधुर आवाजात राष्ट्रगीत गायनाने परिसर प्रफुल्लित झाला . त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली . सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आठवड्याभरापासून घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचे बक्षीस  मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले .

प्रास्तविक मुख्याध्यापक भागवत शिंदे यांनी केले .
 नवीन शाळेच्या भौतिक सुविधांबाबत गावकऱ्यांना आव्हान केले. यावेळी बऱ्याच गावकऱ्यांनी शाळेला लागणाऱ्या साहित्याची मदत वस्तू रुपात देण्याचे ठरवले. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 हजाराचा शैक्षणिक उठाव शाळेत करण्यात आला .
यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील, पोलीस पाटील बाजीराव पाटील, बाबुराव पाटील, युवराज पाटील, अनिल पाटील, आशा सेविका उषा पाटील, शाळा व्यवस्थापन सदस्य, सर्व मंडळाचे कार्यकर्ते पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार अध्यापक भाऊसो भोसले यांनी मानले .

फोटो ओळ - खडूळे ता . गगनबावडा येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहन करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ . पुनम पाटील व मान्यवर