लोकसभेसाठी "राजा विरुद्ध प्रजा" ची काेल्हापूरकरांना उत्सुकता

Kolhapur news
By -

                 


               कोल्हापूर न्यूज  /  वि. रा .भोसले


लोकसभेचा आखाडा अगदी जवळ येऊन ठेपला आहे.कांहीची उमेदवारी निश्चित झाली तर कांहीं अजून रिंगणाबहेर असून घोषणेची वाट पहात आहेत .सर्व इच्छुक उमेदवारांनी मात्र अगदी आता पासूनच शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे.काहींचे दंडावर तर काहींचे मांडीवर .

    महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढती मध्ये बारामती व कोल्हापूर चा समावेश करता येईल.

   कोल्हापुरात छ्त्रपती शाहू महाराज यांचे काँग्रेस मार्फत नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.मतदार संघातील तमाम मंडलिक प्रेमींनी आतापासूनच रान उठवायला सुरुवात केली आहे.

    स्व.सदाशिवराव मंडलिक यांचेवर नितांत श्रध्दा असलेले त्यांचे चाहते म्हणतात 

 "होऊन जाऊदे पुन्हा एकदा राजा आणि प्रजा यांची लढत."

   २००९ ला छ्त्रपती संभाजी राजे व स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्यात लढत झाली होती व स्व. मंडलिक विजयी झाले होते.

    स्वतः मंडलिक यांनी त्यावेळी आपल्या पाठीराख्यांना सांगितलेले किस्से येथे मांडणे क्रमप्राप्त आहे.

२००९ मध्ये संभाजी राजे यांचे नाव घोषित होताच अनेकांनी  मंडलिक यांना भीती घालायला सुरुवात केली.त्यावेळी मंडलिक यांनी एकच उत्तर सर्वाँना दिले होते. मी समाजसेवेसाठी राजकारणात उतरलो आहे.एखादे पद किंवा खुर्ची मिळावी म्हणून नव्हे.

   हसत मिश्कीलपणे ते म्हणत 

 मी झाडावर पिकलेला. आंबा आहे. आडीत घालून पिकविलेला आंबा नाही.कोणी कांहीही म्हणो 

मी निवडणूक लढविणारच.तितका पैसाही माझ्याजवळ नाही हे मला माहित आहे.माझी जनता त्याची सोय करेल याची मला खात्री आहे ,कारण हा लढा दोन व्यक्ती मधला नाही तर राजा विरुद्ध प्रजा असा असणार आहे.

   आपल्या आवडत्या नेत्याचे हे बोल ऐकताच त्यांच्या पाठीराख्यांत आनंद आणि आत्मविश्वास यांची लाट तयार झाली.

   नांगरलेल्या शुष्क रानावर पावसाची जोरदार  बरसात व्हावी व अत्तरालाही मागे टाकील असा  भिजल्या मृतिकेचा सुगंध पसरावा तसे वातावरण निर्माण झाले.

   बसलेले शेकडो कार्यकर्ते ताडकन उभे राहिले आणि त्यांनी गगन भेदी घोषणा दिली.

   "मंडलिक साहेबांचा विजय असो .मंडलिक साहेब तुम आगे बढो हम तूम्हारे साथ है."

     यागगनभेदी घोषणांचे पडसाद मतदार संघात जागोजागी ,गल्ली गल्लीत उमटू लागले.तसे ते छत्रपतींच्या न्यू पॅलेस वर सुध्दा जाऊन थडकले.

    छत्रपतींनासुध्दा आव्हान मिळू शकते हे कोल्हापूर करांनी दाखवून दिले.विशेषत: जुने कोल्हापूर म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवाजी पेठ,मंगळवार पेठ ,बुधवार पेठ मधून मंडलिक यांना जोरदार पाठिंबा मिळत होता.

   स्व.मंडलिक यांच्यावरील लोकांचे प्रेम पाहून प्रसार माध्यमे सुध्दा सरसावली होती.मोठ्या मथळ्या च्या बातम्या येऊ लागल्या .मुद्रित प्रसार माध्यम त्यावेळी आजच्या इतकेच प्रभावी होते.

    स्व. मंडलिकाना साथ दिली ती वृत्तपत्रांनी आणि सामान्य जनांनी.

     सामान्य जनतेचा कौल घेण्याची त्यांची पद्धत अफलातून होती.टायपिस्ट,चर्मकार,हमाल,दुकानदार,शेतात काम करणारे स्त्री पजुर यांना ते आपल्या कार्यकर्त्या मार्फत विचारायचे .

   तुमचे मत कुणाला.?

मंडलिक सायबाला .

   राजा काय कधि वाड्यातून बाहेर पडतो का ?

  'मुजरा आणि मते 'यात तफावत असते हे त्यावेळी लोकांनी दाखवून दिले होते.

अशा लोकप्रिय नेत्याचे चिरंजीव खा.संजय.मंडलिक यांना ही जनतेने पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले होते.कोल्हापूरचा एक काळ असा होता की कामाची धमक असणारा नेताच येथे नव्हता .खासदार तर सोडाच पण आमदाराला सुध्दा दिल्ली मुंबईत कोणी विचारत नव्हते.यशवंतराव चव्हाण ,वसंतदादा पाटील ,बाळासाहेब देसाई,पुढे विलासराव देशमुख,सुशील कुमार शिंदे आणि बारामतीकर पवार यांचेच महाराष्ट्रावर वर्चस्व होते.

  व्हॉलीबॉल सामन्यात बाहेर गेलेला बॉल पळत जाऊन आणून द्यायचा एवढंच काम करणारे कांहीं नवशिके खेळाडू असतात .त्यांना पटांगणात प्रवेश नसतो.

 कोल्हापूर करांची अवस्था पूर्वी तशीच होती.आताच्या नेत्यांनी ती बदलून टाकली आहे.

   सदाशिवराव मंडलिक यांनी शरदपवार यांनासुध्दा दाद दिली नव्हती.वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून उच्च विद्याविभूषित प्रा.संजय मंडलिक यांनी खासदारकी लढवली,जिंकली आणि हम भी कुच्छ कम नहीं हे दाखवून दिले.संसद रत्न हा किताब नसतो .कामावर आधारित  माध्यमांनी  केलेला गौरव असतो.पाचशे जणांना तो सन्मान  मिळत नाही .बोटावरच्या थोड्याच खासदारांना तो मिळतो.

   खा संजय मंडलिक यांना तो मिळाला आहे.

 हेही नसे थोडके.

   सद्या चर्चा रंगली आहे ती हीच की छत्रपतींच्या विरोधात संजय मंडलिक यांनीच  शड्डू  ठोकला पाहिजे.त्यांचे स्वतः चे काम तर आहेच पण वडिलांच्या अफाट लोकप्रियतेचा लाभही त्यांना मिळणार आहे.

   स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूरला ताठ मानेने उभा केले.तसे संजय मंडलिक सुध्दा कोल्हापूरचे नाव दिल्लीत चमकणार याची मतदारांना खात्री आहे.

   शाहू महाराज आणि छ्त्रपती या पदव्या आहेत नावे किंवा आडनावे नाहीत हे जनतेने ओळखले आहे.

    म्हणूनच या मतदार संघात लाट आलीय.

      पुन्हा एकदा ,राजा विरुद्ध प्रजा अशी लढत.