आदमापुरचे बाळूमामा मंदिर तीन दिवस बंद रहाणार

Kolhapur news
By -

           



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  आदमापुर येथील बाळूमामा मंदिर आगामी भंडारा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी  दिनांक १८ ते २० मार्च बंद रहाणार असल्याचे प्रशासक मंडळाकडून कळविण्यात आले आहे. कांहीं स्वयंसेवी भाविकांच्या सहभागाने मंदिर अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले आहे.

  लाखो भक्तांची या उत्सवात गर्दी होत असलेने पोलिस बंदोबस्त,पार्किंग व्यवस्था वाहतूक नियंत्रण ,पिण्याचे पाणी,भक्त निवास, प्रसाद इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.वैशिष्ठ्य म्हणजे स्वयंसेवक यात नेहमीप्रमाणे भक्तिभावाने  आपले योगदान देतांना दिसत आहेत.