"होळी लहान,पोळी दान" उपक्रमाने भागविली गरिबांची भूक

Kolhapur news
By -

      



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  डी. आर. माने महाविद्यालय कागल -विवेक वाहिनी विभाग, माजी विद्यार्थी संघ आणि NCC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे "होळी लहान,पोळी दान"  उपक्रम राबविण्यात आला..


होळी सणानिमित्त केलेली पोळी होळी मध्ये टाकून वाया न घालवता ती दान स्वरूपात संकलित करून जमा केलेल्या पोळ्या अनाथ मुलांचे बालगृह आणि ऊस तोडणी कामगार यांना खाऊ घालण्यात आल्या...


यावेळी विवेक वाहिनी विभाग प्रमुख डॉ. लखन भोगम, NCC विभाग प्रमुख कॅप्टन संतोष जेठीथोर, बालगृह अधीक्षक साळुंखे सर, प्रा. आबासाहेब चौगले, अंनिसचे हरी आवळे,माजी विद्यार्थी संघ -

अध्यक्ष-  नेताजी बुवा, सचिव - विवेक पोतदार, अंशुमन कांबळे बुध्दभूषण सोनवले, ओंकार कांबळे, अभि शिंदे, प्रथमेश गुरव, नितीन कांबळे, ऍड.तुषार सोनुले, प्रताप कांबळे,  हेमंत बन्ने, स्वागत कांबळे, अमित राजदीप यांच्यासह विवेक वाहिनी, NCC चे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते...