कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघांनी एकत्र प्रवास केल्याची माहिती आहे. यामुळे या दोन्ही कुटुंबातील राजकीय वैर संपणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा प्रीवेडिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मुंबईहून गुजरातच्या जामनगरला जाताना रश्मी ठाकरे व अमृता फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केल्याची माहिती आहे. या प्रवासात रश्मी व अमृता यांच्यात कोणता संवाद झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या सकारात्मक घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील राजकीय कटूता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा दावा केला जात आहे.

