कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चांद्रयान ३ ची मोहिम यशस्वी करणाऱ्या बेंगलोर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेस भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती च्या महिला शाखेच्या 45 शिक्षकां आज कोल्हापूर विमान तळावरून बेंगलोरला रवाना झाल्या . त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे व पदाधिकारी उपस्थित होते . सर्व महिला शिक्षिकांनी आपल्या हातातील फुगे आकाशात सोडून या वैज्ञानिक सहलीचा शुभारंभ केला .
ऑगस्ट 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान - 3 चे यशस्वी लँडिंग करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय बेंगलोर येथे आहे .त्या इसरो या संस्थेला भेट देण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने ISRO बेंगलरु या संस्थेस भेट देण्यासाठी 45 महिला शिक्षिका जात आहेत . आमच्या संघटनेमार्फत महिलांच्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात . चालू वर्षी जगविख्यात इस्रो ही संस्था पाहून तेथील मराठी शास्त्रज्ञाशी चर्चा करणे चांद्रयान व इतर उपग्रह प्रक्षेपण याबाबतची माहिती घेणे व बेंगलरू येथील हिंदुस्थान एरनॉटिक्स संस्था, डॉ . विश्वेश्वरय्या गॅलरीज , एरोस्पेस म्युझियम या संस्थेतील वेगवेगळे विभाग पाहणे असा भरगच्च कार्यक्रम वैज्ञानिक सहली मध्ये आहे . महिला शिक्षिकांनी .महिला शिक्षिकांच्या साठी आयोजित केलेली वैज्ञानिक सहल हे एक वेगळे वैशिष्ट्य या सहलीचे आहे . नारीशक्तीचा सन्मान करणारा व वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणारा उपक्रम समितीने घेतलेला असून यामध्ये सहभागी असलेल्या महिला शिक्षिका या उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविणाऱ्या शास्त्रज्ञ शिक्षका आहेत असे आम्ही मानतो .असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी त्यांना शुभेच्छा देतांना केले .
महिला शहराध्यक्ष सविता गिरी पतसंस्थेच्या संचालिका वर्षाराणी वायदंडे 'रोहिणी येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भटकंती टूर्सचे सूरज देशमुख व स्नेहा देशमुख यांच्या नियोनियोजनाखाली ही वैज्ञानिक सहल आयोजित करण्यात आलेली आहे .यावेळी या महिला शिक्षक भगिनींना शुभेच्छा देण्यासाठ समितीचे राज्यसचिव शिवाजी भोसले विभागीय अध्यक्ष महादेव डावरे समितीचे पदाधिकारी साताप्पा कासार मच्छिंद्र नाळे कुमार पाटील ,अरुण गोते ,गोरख वातकर ,किरण खटावकर ,अमित परीट ,सरदार पाटील ,शिवाजी सोनाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
.



