स्व.सदाशिवराव मंडलिक हे स्वाभिमानी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते होते

Kolhapur news
By -

         

                      


             कोल्हापूर न्यूज  /  वि .रा. भोसले


   सत्तेच्या राजकारणात कित्येक रथी महारथी आले आणि गेले.पण स्व.सदाशिवराव मंडलिक हे 

    त्या सम त्या 

या  उक्तीला पुरेपूर न्याय देणारे असे व्यक्तिमत्व होते.

  स्वाभिमान हा त्यांचा पिंड होता.त्याशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.

   गोरगरीब आणि सामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडलेली असायची. म्हणुनच त्यांच्या सभांना जनसैलाब उसळून यायचा.

    आजच्या 'तळ्यात मळ्यात ' च्या राजकारण्यांनी  त्यांचा आदर्श घ्यावा.

    या तत्वनिष्ठे मुळेच त्यांच्या मागे सुध्दा एकनिष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक यांचे विस्तीर्ण वलय पहायला मिळते.

    राजा विरुद्ध प्रजा असे युद्ध कागल मधील आमदार व खासदारकीच्या  मतदारसंघात  पहायला मिळाले होते.

           येत्या निवडणुकीत असेच चित्र पहायला मिळेल अशी दाट शक्यता आहे.

    प्रजा हा मंडलिक साहेबांच्या राजकारणाचा आत्मा होता. बहुदा नेता हा धन,दौलत, मानमरातब,प्रतिष्ठा, श्रेयवाद या बाबींना प्राधान्य  देतो. सद्याच्या प्रचलित उक्ती नुसार या बाबीच त्यांचे सगेसोयरे असतात.

    मंडलिक साहेबांचे सगे सोयरे म्हणजे गरीब शेतकरी,हमाल,टायपिस्ट , ढकलगाडीवाला,नवीन सरपंच झालेला युवक, दूध वाला,भाजी विकणारा, देवळातला पुजारी, गटारे साफ करणारे कर्मचारी,छोटे व्यापारी, कारकून, बुट्ट्या विणणारे कामगार, हेच होत.

     वेदगंगा,आणि दूधगंगा यांना जोडणारा 

आदमापुर जवळील कालवा जेंव्हा तयार झाला तेंव्हा दोन्ही हात जोडून बाळूमामा समोर उभ्या राहिलेल्या देवता असाच जणू भास व्हावा.

    साहेबांचे ते पहाटेचे स्वप्न होते.ते सत्यात उतरले आणि लाखोंच्या गर्दीत त्याचे उद्घाटन झाले तेंव्हा शेतकरीच काय पण शाळकरी पोरं पोरी सुध्दा हलगीच्या तालावर लेझिम खेळू लागली.नदी काठच्या  गावातील देवळात ढोल वाजू लागले, घटांनाद घुमू लागला .

     दरवर्षी  नदीपात्रातील वाळूत खड्डे खणून जलदेवतेची आराधना करावी लागायची.आज दोन्ही नद्या बारमाही दुथडी भरून असतात.

    मंडलिक साहेबांच्या दूर दृष्टीचा आणि शेतकऱ्यां विषयी वाटणाऱ्या तळमळीचा हाच पुरावा होता. काळम्मावाडी धरण सुध्दा आज त्यांच्या स्मृतीला नयन भरल्या अश्रूंनी सलाम करत असेल.

            असा नेता होणे नाही.

           असा सेवक होणे नहीं.