कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अयोध्येमधील रामलल्लांच्या दर्शनासाठी मुरगूड व परिसरातून अनेक रामभक्त रवाना झाले आहेत.
राम आयेंगे ची प्रतिक्षा २२ जानेवारी रोजी संपली .त्यानंतर राम आये है ची भक्तिगीते सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागली.त्यापेक्षा मोठे आकर्षण म्हणजे प्राण प्रतिष्ठे नंतर राम लल्लांची अगदी सजीव भासणारी मूर्ती. या सावळ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कोटी कोटी राम भक्त आयोध्येकडे धाव घेत आहेत.
कागल तालुक्यातील एकूण १३०० राम भक्त आज अयोध्येकडे रवाना झाले.आस्था स्पेशल ट्रेन ने निघालेल्या रामभक्तांना शुभेच्छा देण्याकरिता.माझी आमदार अमल महाडिकव कागलच्या शाहू ग्रुपचे समर जितसिंह घाटगे हे स्टेशन वर उपस्थित होते.
हे राम भक्त ३ मार्चरोजी परत येतील.
श्री रामाच्या जयजयकारात त्यांनी कोल्हापूरच्या छ्त्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशनप्रकाश वरून अयोध्ये साठी प्रस्थान केले.
मुरगूड येथील राम भक्त असे.
प्रकाश परिशवाड,सर्जेराव भाट,अजित तेलवेकर,मारुती मगदूम,सिद्दू पाटील,अजित तेलवेकर,सुशांत गवाणकर, मुरमुरा मगदूम ,सुशांत गवाणकर,ई.

