शरद पवारांनी अजित पवार गटात असणाऱ्या मानसपुत्राची केली विचारपूस

Kolhapur news
By -

       



             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले . तेव्हापासून शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात अबोला दिसून येत होता. मात्र, दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाली असून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः दिलीप पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी  ही दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली

दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र असल्याचे पूर्वी म्हटले जात होते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.