कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वर्षातून एकदाच येणारा रंगपंचमी उत्सव मुरगूड मधील महिलांनी अगदी उत्साहात साजरा केला.
'बुरा न मानो, होली हैं '
या घोषवाक्याचा पुरेपूर वापर करत महिला भगिनींनी एकमेकींना अक्षरशः रंगांची अंघोळ घातली.येवढेच नव्हे तर होळी गीतांचे वाद्य लावून त्यावर नृत्याचा तालही धरला.
रंग उधळत नृत्याचा मनमुराद आनंद घेत या महिलांनी सामाजिक सामंजस्य सुध्दा दाखवले .हिंदू ,मुस्लिम, ख्रिस्चन अशा सर्व धर्मीय महिलांनी आपला सहभाग नोंदवला हे या उत्सवाचे वैशिष्ठ्य होय.
पाटील नगर,ज्ञानेश्वर कॉलनी ,व इतर उपनगरात महिलांनी रंगपंचमी साजरी केली.
या उलट युवकांनी सायलेंसर काढलेल्या मोटारसायकल चालवून शहरी शांततेचा भंग केला.
या तुलनेत महिलांच्या रंगोत्सवाचे नागरिकांकडून कौतुक झाले.

