कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जगात भारी कोल्हापुरी...
तिसऱ्या कार्यकाळात कोल्हापूरकर असा गोल करणार की इंडियाआघाडी पाहतच राहणार...
फिर एक बार मोदी सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या प्रचार सभेत...
"गरिबो की सरकार, मोदी सरकार " अशा घोषणा दिल्या.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला . काँग्रेसचे सर्व पाप माफ करत राम मंदिर ट्रस्टने प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिले. तरीदेखील त्यांनी या निमंत्रणाचा अवमान केला. ज्यांनी कायमस्वरूपी राम मंदिराचा विरोध केला आहे .
शिवसेने विषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सनातन धर्माला डीएमके पार्टी विरोध करते. त्यांचा शिवसेने सारखे पक्ष सन्मान करतात हे पाहून बाळासाहेब ठाकरेंना किती वाईट वाटले असते. नकली शिवसेना या सर्व एजंटांसोबत मिळून काम करत आहेत. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना या सर्वांचे खूप दुःख झाले असते.
शाहू महाराजांच्यावर वक्तव्य टाळले
या सभेला संबोधित करतांना नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. परंतु कुणीही शाहू महाराज यांच्यावर वक्तव्य केले नाही. शाहू महाराजांचा उल्लेख या सर्व नेत्यांनी टाळला.

