जालना : या लोकसभा निवडणुकीत आपण फार सक्रिय नसलो तरी अकोला लोकसभा मतदार संघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज राहील. मराठा समाजाने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मतदान करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आग्रही आहेत. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या पहिल्या आंदोलनापासून ते आपल्या समाजसोबत राहिलेले आहेत. आपली आरक्षणाची लढाई संसदेत लढण्यासाठी ॲड. आंबेडकर यांच्यासारखे अभ्यासू आणि कायद्याचे तज्ञ संसदेत असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाने अकोला मतदार संघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मतदान करावे. तसेच कोल्हापूर मतदार संघात छत्रपती शाहू महाराज यांना मतदान करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

