कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सुशीला भंगार वाली या नावानेच ती मुरगूड मध्ये ओळखली जाते.गेली पन्नास वर्षे गावात भंगार गोळा करण्याचे काम ती करते.त्यात प्लास्टिक फुटक्या बादल्या ,रद्दीचे कागद.धातूच्या टाकाऊ वस्तू ,कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या काचेच्या बरण्या,अशा एक ना अनेक वस्तू सुशीला गोळा करते.
थोडक्यात गावाची एक प्रकारे स्वच्छता व सेवा सुध्दा करते.भंगार गोळा करून ते कोल्हापूरच्या मोडक्या बाजारात विकायचे आणि त्यावर चरितार्थ चालवायचा असे एक दोन वर्षे नव्हे तर पन्नास वर्षे ती कष्ट उपसत आली आले.दुसरं काय करणार.?
सकाळी सात वाजल्या पासून तिची हात गाडी गल्ली गल्ली तून फिरत असते.सूर्य डोक्यावर आला की घरी येऊन स्वैपाक करून चार घास खायचे.पुन्हा सायंकाळी दुसरी फेरी करायची.
चार चाका वरची तिची ही जिंदगी परवा अचानक थांबली.साडीत पाय अडकून ती घरात पडली आणि तिचा उजवा पायच मोडला.हाड सरकले. डावा पाय सुध्दा दुखावला आणि तिचा गाडा बंद झाला.
हाता तोंडाची गाठ पडणे मुश्किल झाले तिथं औषध पाण्यासाठी पैसे कोठून आणायचे ?अर्ध्या तिकीटात तिने कोल्हापूरचे सी पी आर हॉस्पिटल गाठले.मोफत उपचार झाले पण जेवणाचे काय ?मागील वर्षी येथील राणा प्रताप क्रीडा मंडळाने तिच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले होते.एका भंगार वालीला हा मान दिल्या मुळे मंडळाचे शहरभर कौतुकही झाले होते.
त्याच मुलांना सुशीला ची ही दयनीय अवस्था समजली.ताबडतोब ही मुले कामाला लागली.सामाजिक कामात सतत अग्रणी असलेल्या या मुलांनी वर्गणी काढून साडे सात हजाराचा रोख मदत निधी जमविला .याशिवाय रवा,साखर , गोडे तेल ,तांदूळ ,आणि किरकोळ मसाल्याचे साहित्य असा रेशन चा माल गोळा केला आणि तिच्या घरी पोच केला.
सुशिलाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.देशाचा झेंडा फडकवताना अभिमानाने उर भरून आला होता तसा ऋणाईताच्या भावनेने आज तिचे डोळे डबडबले आणि उर भरून आला.वयाने मोठी असून ही टी मुलांच्या पाया पडायला पुढे आली.मुले मागे सरकली आणि म्हणाली सुशीला मावशी आता पायावर पुन्हा उभे राहायचे. मुरगूड च्या या तरुणाईचा आदर्श घेण्या सारखा आहे.
यात कांहीं सर्प मित्र सुध्दा आहेत.कोठे ही केंव्हाही ही मुले विषारी साप पकडून जंगलात सोडून येतात.कसलेही मानधन नाही.गाव तलावाच्या भोवतालच्या बियर व दारूच्या बाटल्या गोळा करून त्यांनी गाव स्वच्छतेचा वेगळा आदर्श ही घालून दिला होता.मद्यपान आणि गांजा यांच्या नशेत स्वतःला झोकू पाहणाऱ्या आणि पालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या उडान टप्पू ना ही मोठी चपराक आहे.
सुशीला ला मदत करणाऱ्या मध्ये पुढील युवक व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
सोमनाथ यारनाळकर,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,जगदीश गुरव यांनी प्रथम सुशीला मावशीला भेटून समस्या समजून घेतल्या.त्यांच्या समवेत इतर कांहीं ज्येष्ठ नागरिक सुध्दा मदतीला पुढे आले.त्यामधे नगर परिषद मुकादम बबन बारदेस्कर,तानाजी भराडे,समाधान हावळ,विक्रम गोधडे,राजू आमते, ज्योतिराम सुर्यवंशी,सुहास देवळे,मयूर आंगज,सुमित मांगोरे,अजित खराडे,युवराज पाटील,समीर हळदकर,अमोल पाटील, प्रा. व्हीं आर भोसले, विनायक चौगुले ,किरण गवाणकर,आणि सकल मराठा समाज या सर्वांचे सहकार्य लाभले.


