मुरगूड मध्ये वाहतुकीची ऐसी तैसी

Kolhapur news
By -

      

             


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुरगूड किती स्वच्छ सुंदर शहर आहे. पण इथल्या कांहीं महाभागांना त्याचं कांहीं पडलेल नसतं. रस्त्यावर कुठेही कशाही चार चाकी,दुचाकी गाड्या लावायच्या आणि कुठेतरी गायब व्हायचं. हे महाभाग म्हणजे शहराची शान तर घालवतातच पण वाहतुकीचा बोजवारा उडवून लावतात.आता हे चित्र पहा.चार चाकी वाहन असे लाऊन गेलाय की एस टी बस ला नीट टर्न पण घेता येत नाही. शहरात कोठे सिग्नल नाही की ट्रॅफिक पोलिस नाही.


   वाहतुकीचा नियम नागरिकांनी स्वतःच  पाळायला हवा. पानपट्टी वर गुटखा खायला गर्दी करतात.दुचाक्या कशाही उभा करायच्या व पिचकाऱ्या मारत बसायचं.मागे शिवाजी महाराज आहेत याचं ही भान नसतं.

    'आय लव्ह मुरगूड 'असा सुंदर  रंगीत फलक नगर पालिके समोर झळकतो आहे.त्याचे भान ठेऊन वाहन धारकांनी सुध्दा वाहतूक नियमांचे तारतम्य बाळगले पाहिजे अशी अपेक्षा येथील शिवप्रेमी युवकांनी  केली आहे.


        


मुरगुड मध्ये कोणीही उठतो कुठेही गाडी लावून गायब होतो ट्रॅफिकची कोंडी होते  कोणाला काय पडलेलं नसतं