मुरगूड ते अक्कलकोट थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे.
स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या मुहूर्तावर दिनांक १० एप्रिल पासून सकाळी ८.३० वाजता ही बस अक्कलकोट कडे मार्गस्थ झाली असे एस टी महामंडळ व आगार व्यवस्थापक यांचेकडून सांगण्यात आले.
मध्यंतरी ही बस सेवा पंढरपूर व अन्य कांहीं तीर्थ क्षेत्रांच्या मार्गे होती. दीर्घ प्रवास व अनेक टप्पे यामुळे प्रवाशांचा तितकासा प्रतिसाद न मिळाल्याने ती बस सेवा तोट्यात गेली.त्यामुळे ती खंडित करण्यात आली होती.
यावेळी थेट अक्कलकोट सेवा असलेने प्रतिसाद चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे.
बससेवा बंद केल्याने ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली होती.
नवीन बस सेवेमुळे नागरिकांत समाधान असून ती नियमित सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

