कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मोहन जाधव शिक्षण प्रसारक मंडळा मार्फत घेण्यात येणारी विद्यार्थी प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूल निपाणी येथे निपाणी केंद्रावर परीक्षार्थीं, पालकांनी गर्दी केली होती. निपाणी केंद्रावर इयत्ता दुसरी ते सातवी पर्यंतच्या एकुण तिनशे पस्तीस परीक्षार्थींनी भाग घेतला.
मोहन जाधव ,कुरबेटी मॅडम, स्वाती पाटील मॅडम, बामने सर, अदिती घाडगे, प्रियांका काळे, संध्या वाघडोळ, अंकिता पाटील, सई रानमाळे यांच्यासह इतरांनी परीक्षेचे संयोजन केले . ढोणेवाडी परिसरातील एकुण नव्वद परीक्षार्थींनी भाग घेतला. या केंद्राची परीक्षा घेण्याचे काम परीक्षा मंडळाच्या सदस्या कु. पल्लवी माळी व कु. भक्ती बेनाडे यानी पाहिले.






