कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ब्रह्माकुमारी च्या गॉडलिवूड स्टुडिओ द्वारे ब्रह्माकुमारीजचे संस्थापक पिताश्री ब्रह्मा बाबा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक एक अद्भुत जीवन कहानी या पुस्तकाच्या आधारे द लाईट हा चित्रपट निर्मित करण्यात आलेला आहे .प्रोडूसर बि.के. हरिलाल भानुशाली असून सुजित सरकार हे त्याचे क्रिएटिव्ह प्रोडूसर आहेत , ही सत्यकथा एका श्रीमंत आणि संपन्न हिऱ्याच्या व्यापाऱ्याची आहे . यांचे नाव लेखराज खूपचंद कृपलानी असे होते , ज्यांनी आपली संपूर्ण संपत्ती एका ट्रस्टच्या नावे केली ज्याचे लक्ष महिलांना सशक्त बनवणे तसेच मानवी मूल्याच्या विषयी जागरूकता पसरवणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून जगामध्ये शांतता आणि सद्भभावना प्रस्थापित करणे होते .त्यांनी विलासी जीवन त्यागले आणि राजयोगाच्या मार्गावर अग्रेसर झाले आध्यात्मिकतेच्या या नव्या मार्गामध्ये त्यांनी हिंमत आणि सहसाने अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना केला .या संपूर्ण अध्यात्मिक जीवन यात्रेमध्ये त्यांना सर्व शक्तिमान परमात्मा द लाईट द्वारे निरंतर मार्गदर्शन मिळाले आणि ते सशक्त बनले आपल्या नश्वर शरीराला त्यागल्यानंतरही जी आध्यात्मिक यात्रा त्यांनी सुरू केली होती ती आजही जगभरामध्ये अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत आहे.
कोल्हापूर मध्ये हा चित्रपट दिनांक 18 एप्रिल 2024 पासून दिनांक 24 एप्रिल 2024 पर्यंत प्रभात टॉकीज लक्ष्मीपुरी येथे रोज एक शो सकाळी 10 ते 11.30 या वेळेमध्ये दाखवला जाणार आहे ,याचे पासेस 100 रुपये 120 रुपये 130 रुपये प्रमाणे शिवाजी पेठ येथील ब्रह्माकुमारी केंद्रामध्ये मिळतील , तरी जीवन परिवर्तन करणारा हा प्रेरणादायी चित्रपट सर्वांनी अवश्य पहावा असे आव्हान कोल्हापूर सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा बहिणजी यांनी केले आहे.

