मुरगूड मध्ये भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव संपन्न.

Kolhapur news
By -

 

           

      
         


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 आज रामनवमी.अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना समारोहानंतर देशभर प्रथमच रामनवमी म्हणजेच राम जन्मोत्सव साजरा होत आहे.

    मुरगूड शहरात सुध्दा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि तितक्याच उत्साहात राम नवमी साजरी करण्यात आली.

  सकाळी राम मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला.करवीर हळदी गावचे कीर्तनकार ह.भ.प.श्रीरंग पाटील महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

 बरोबर बारा वाजता जन्म काळ सोहळा संपन्न झाला.महिलांनी पाळणा म्हंटला.सुठवडा व लाडू यांचे प्रसाद वाटप करण्यात आले.

   सायंकाळी सांगीतिक भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.जन्मोत्सव पार पडल्यानंतर भक्त जनांची दर्शनासाठी रीघ लागली होती.

  सोहळ्याचे नियोजन मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.त्यांना राम भक्त तानाजी भराडे,प्रकाश पारिश्र्वाड, सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,आनंद रामाणे,शिवाजी चौगुले ,महेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले.