कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाला लाभलेले एक अनमोल रत्न आहे..
14एप्रिल हा त्यांचा जन्म दिन.
ते विचाराने,प्रेरणेने आणि इतिहासाने आजही आमच्या समवेत आहेत. तेंव्हा त्यांचे विचार महत्वाचे आहेत.
राष्ट्राची घटना त्यांच्याच नेतृत्वाखाली तयार झाली म्हणून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे जनक असे त्यांना म्हंटले तर वावगे होणार नाही.
बॅ .गांधी आणि डॉ.बाबासाहेब यांच्यात कांहीं वैचारिक मुद्यावर मतभेद होते.
गांधीजी त्यावेळचे मोठे नेते होते त्यामुळे डॉ.आंबेडकर त्यांना मान देत पण त्यांना लोकांनी महात्मा ठरवले हे त्यांना रुचले नव्हते.एका मुलाखतीत त्यांनी तसे स्पष्ट संगीतले ही होते.
त्यांच्या मुलाखतीतील वाक्ये अशी आहेत.
I met Gandhi in capacity of opponent.Other went there as devotees.Saw nothing of him except the external appearance which he had put as Mahatma.
विरोधकांच्या भूमिकेतून मी गांधींना भेटलो.लोक त्यांच्या बाह्य रुपावरून त्यांना महात्मा संबोधत होते.
डॉ.आंबेडकर यांचा राज्य शात्र,अर्थ शास्त्र व.सामाजिक समस्या यावरील अफाट अभ्यासामुळे गांधी व नेहरू प्रभावित झाले होते.
देशाची फाळणी झाली तेंव्हा गांधी व जिनांच्या भूमिकेशी डॉ.आंबेडकर सहमत नव्हते.
इंग्रजांनी त्या दोघांना.फार महत्व दिले होते.त्यामुळे त्यांची मते घेतली गेली
फाळणी झाली आणि सुरू झाले ते भयानक मृत्युकांड.
पाक मधून भारतात येणाऱ्या भारत मातेच्या महिला आणि पुरुषांचे .
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अश्रूंना वाट करून दिली.त्यानंतरचे गांधीजींचे ते बहुचर्चित उपोषण
गांधीजी मुस्लिम धार्जिणे, पाक धार्जिणे आहेत म्हणून पसरलेला असंतोष आणि त्यातून जगाने पाहिलेला तो भयंकर प्रसंग.
हे राम ..
डॉ. आंबेडकर या.प्रसंगाने कमालीचे व्यथित झाले.सुन्न झाले.
गांधीजी गेले आणि भारतीय संविधानाची मोठी.जबाबदारी त्यांचेवर पडली .
. ती त्यांनी पार पाडली.पंडित नेहरूंनी घुसडलेल्या कलम 370ला त्यांनी व वल्लभ भाई पटेल यांनी विरोध केला.शेख अब्दुल्ला इरेला पडले.दरम्यान वल्लभ भाई सुध्दा गेले.
370 घुसडले गेले.स्वतंत्र कायदा,स्वतंत्र.झेंडा ,तिरंग्याचा अवमान पदोपदी सुरू झाला.
बाबासाहबांनी पुन्हा अश्रू ढाळले.
ते.म्हणत
"व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठे "
भारत भूमीच्या इतिहासातील दैदिप्यमान.प्रसंगाची आठवण.करून देताना ते म्हणत,
"जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत."
भारत देशाला सशक्त करायचे असेल तर आधी महिलांना राष्ट्र प्रवाहात आणा.
"जेथे महिला प्रगत ते राष्ट्र प्रगत.महिलांना सन्मान द्या "
बाबासाहेबांच्या या महान विचारांचे द्योतक म्हणजे दोन महिला राष्ट्रपती देशाला मिळाल्या
प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी. मुर्मु.
सामजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गा ला त्यांनी.प्रेरणा दायक संदेश.दिला .
उठा , शिका आणि संघर्ष करा.तर तुम्हाला राष्ट्र.प्रवाहात स्थान मिळेल.
. या समाज बांधवांना. प्रतिष्ठा आणि सन्मान मिळाला आहे त्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांचे होय.
या ज्ञान सूर्याला कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद.

