नीढोरी ते आदमापुर बाळु मामांचा चार तास रथोत्सव.

Kolhapur news
By -

 



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


बाळूमामांचा भंडारा सुरू झाला आहे.दक्षिण महाराष्ट्र , उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेश भक्तांचा महापूर आदमापुर कडे वहात आहे.

 उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढरांच्या दूधाचा रथोत्सव होय.

रथोत्सवाचे कुतूहल भाविकांमध्ये  नेहमीच असते.

    बाळूमामांच्या मेंढ्यांचे एकोणीस कळप आहेत .त्यांना बग्गी असे म्हणतात.या सर्व बग्गी तील मेंढ्यांचे दूध काढून ते घागरी तून भरले जाते व या दुधाच्या घागरींची रथातून मिरवणूक निघते. निढोरी ते आदमापुर या दीड किलोमीटर अंतरावर या रथोत्सव संपन्न होतो.तो चार तास चालतो.

    भंडाऱ्याची अखंड उधळण , ढोल कैताळ वाद्यांचा आणि चांगभलं चा गजर असा हा भक्ती मय  रथोत्सव सोहळा असतो.

    लाखो भक्त यात न्हाऊन निघाले.

 देवालयाचे मानकरी कर्ण सिंह धैर्यशील राजे भोसले  यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली .

   खिरीच्या च्या महा प्रसादासाठी हे दूध वापरले जाते.

   मिरवणुकीत धैर्यशील भोसले,दत्तात्रय पाटील,दिनकर राव कांबळे यशवंत पाटील,विजय गुरव,प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके यांच्या सह लाखो भक्त सहभागी झाले होते.