औरनाळ च्या बाळु मामा दिंडीचे मुरगूड मध्ये भव्य स्वागत.

Kolhapur news
By -

        




     




           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    एक दोन नव्हे तर तब्बल एकवीस वर्षे औरनाळ ता.गडहिंग्लज येथून आदमापुर च्या भंडाऱ्याला येणाऱ्या बाळूमामा दिंडीचे मुरगूड येथे भव्य स्वागत करण्यात आले.

    भजने आणि वाद्यवृंद यांच्या तालावर पुरुष महिला बंधू भगिनींनी घातलेली फुगडी आणि त्याद्वारे साधलेले वारकरी रिंगण हे या दिंडीचे मोठे आकर्षण ठरले.

     सानिका स्पोर्ट्स मार्फत सर्व वारकऱ्यांना केळी व राजीगरा लाडू यांचा फराळ वाटण्यात आला.

और नाळचे बाबासाहेब भोसले,पिंटू भोसले,गंगाराम भोसले, पांडुरंग भोसले,जनार्दन सुतार यांनी या दिंडीचे सारथ्य केले .

    मुरगूड मध्ये सानिका चे संस्थापक दगडु शेणवी , अध्यक्ष रतन जगताप, शिक्षक बँकेचे राजेंद्र चव्हाण,राजेंद्र सावंत,निशांत जाधव, माजी फौजदार पांडुरंग कुडवे,निवास कदम सूरज डेळेकर,गणेश तोडकर तथा पत्रकार वि.रा.भोसले ,राजू चव्हाण,महादेव कानकेकर,प्रकाश तिराळे इत्यादींच्या हस्ते प्रसाद उर्फ फराळ वितरण झाले.

    एस टी बस स्थानक प्रांगणात या भक्तीमय सोहळा संपन्न झाला.