श्री बाळूमामा भंडारा...रागिणी मॅडमनी पेलला भार सारा

Kolhapur news
By -

       

           



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 रागिणी खडके ...बाळूमामा देवस्थानच्या प्रशासन समितीच्या एक प्रमुख सदस्य. एवढे मोठे देवस्थान.लाखो भाविक.सलग पाच दिवस चालणारा भंडारा उत्सव.एखादे प्रशासन चक्रावून गेले असते.

    रागिणी मॅडम ना माहिती होते.ही फार मोठी नव्हे तर प्रचंड जबाबदारी आपल्यावर पडली आहे.

   त्या डगमगल्या नाहीत.त्यांना माहिती होते .

गाव करील ते राव काय करील ?

    त्यांनी गावातील प्रमुख आणि प्रतिष्ठित व्यक्तिना पाचारण केले.त्यांना आवाहन केले.कसलेही मतभेद असले तर ते मामांच्या भंडाऱ्यात बुडवायचे.एक दिलाने काम करायचे.सगळ्यांनी भंडारा कपाळाला लावला आणि सज्ज झाले.हे सगळे मानकरी झाले.यावर फक्त भागणार नाही.मॅडम नी सगळ्या सेवेकरी मुलांना एकत्र केले.कामे वाटून दिली.

   बाळु मामांच्या नावानं चांगभलं म्हणत पोरं कामाला लागली.कसलंही मानधन नाही.केवळ मामांची कृपा हीच  बिदागी.

    भंडारा उत्सवाची  जय्यत तयारी झाली.मंदिर सफाई,सजावट आणि रोषणाई यातून रंग भरू लागला.

    मेंढ्यांच्या दूधाचा रथोत्सव , भाकणुक,दर्शन व्यवस्था,प्रसाद वाटप व्यवस्था ,पोलिस बंदोबस्त,वाहतूक व्यवस्था,पार्किंग ,स्वच्छता गृहे ,निवास व्यवस्था या सर्व सुविधां मध्ये कसलीही बाधा आली नाही.कारण एकच.

   सगळ्या माळेत एकच धागा गुंफला होता.

    मामांची भक्ती आणि भक्तांची अटूट श्रध्दा.

     रागिणी खडके मॅडम या प्रशासन संभाळण्याकरिता आल्या होत्या.त्यांना या परिसराची नीट माहिती ही नव्हती .भौगोलिक दृष्ट्या तीन तालुके एकत्र नांदत होते आणि भक्तीच्या लाटा  शेकडो किलोमीटर वरून येऊन थडकत होत्या.

  त्या शांत आणि खंबीर उभ्या होत्या.मामांना प्रणाम करून म्हणाल्या 

 हे सगळं तुम्हींच निभावून न्यायचं आहे आम्हीं सगळे फक्त निमित्तमात्र आहोत.

    उत्सवाची सांगता गुढी पाडव्याला होईल .तो अत्यंत शांततेने आणि शानदार पणे पार पडावा यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रशासनाला  सहकार्य केले त्यांचे योगदान सुध्दा मोलाचे आहे.

उद्योगपती दिनकरराव कांबळे, कर्णसिंह भोसले,दत्तात्रय पाटील , विजय गुरव,यशवंत पाटील, प्रा. शाम पाटील,शिवप्रसाद ,सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,पोलिस प्रशासन,गारगोटी,संभाजी नगर व सी बी एस येथील एस टी चे आगार व्यवस्थापक ,मुरगूड येथील मोटर व दुचाकी मेकॅनिक (मोफत सेवा) ,पत्रकार या सर्वांनी हा उत्सव चांगभलं च्या गजरात आपल्या खांद्यावर पेलला.

  बाळूमामांनी  आपली अंगुली लावली होती.

  शेगाव, शिर्डी पंढरपूर ही देवस्थाने तिथल्या शिस्ती बाबत प्रसिद्ध आहेत.सरकारी शक्तीचे थोडे बहुत पाठबळ तेथे असते .

  आदामापुरच्या बाळूमामा मंदिराला फक्त भाबड्या भक्तीचे  पाठबळ मिळत असते.

    रागिणी खडके यांनाही तेच पाठबळ मिळाले.