भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कागल मध्ये सम्यक विचार मंचच्या वतीने कॅण्डल मार्च

Kolhapur news
By -

     


   


       


        कोल्हापूर न्यूज  /  कागल प्रतिनिधी 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सम्यक विचार मंचच्या वतीने १३ एप्रिलला रात्री १२ वाजता बस स्थानक चौक ते गैबी चौक या मार्गावरून सम्यक विचार मंचचे अध्यक्ष जे के कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात आला.यावेळी डॉ आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या.

         गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सम्यक विचार मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ.पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावून अभिवादन केले. यावेळी सम्यक विचार मंचेचे संस्थापक अध्यक्ष आयु. रमेश रत्नाकर, अध्यक्ष आयु. जे के कांबळे यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी रमेश रत्नाकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत डॉ आंबेडकर उच्च विद्या विभूषित झाले नसते तर दलित बांधवांची दयनीय अवस्था झाली असती. मात्र डॉ आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत ते उच्च विद्या विभूषित झाले. जगाला आदर्शवत ठरेल अशी भारताची घटना त्यांनी लिहिली. आज याच घटनेवर देश चालत आहे. एवढेच नव्हे तर भारतातील तमाम दलितांचा उद्धार केला. अशा या महामानवाची युवकांनी केवळ घोषणाबाजी न करता डॉ. आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्यावेत .असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी फटाक्याची प्रचंड अतिशबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी सम्यक विचार मंचचे अध्यक्ष जे के कांबळे,

उपाध्यक्ष आयु. संजय पद्माकर ,आयु. बी. वाय.कांबळे , सचिव आयु. प्रशांत करणुरकर , खजानिस आयु. वैभव कांबळे , संपर्कप्रमुख आयु. सुरेश माने,आयु. बी . पी.कांबळे ,आयु.लक्ष्मण कांबळे,आयु. सी. व्ही.कांबळे, आयु.प्रकाश माणगावकर ,आयु.संजय पद्माकर,आयु. गुणाजी भोसले यांच्यासह सम्यक विचार मंचाचे सदस्य, महिला उपस्थित होत्या.