इराण राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन ; परराष्ट्रमंत्र्यांसह ९ जणांचा ही मृत्यू

Kolhapur news
By -

    

           




      इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा


हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणची


सेमी-अधिकृत वृत्तसंस्था मेहरने ही घोषणा केली.


त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले


परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराबदुल्लाहियान यांच्या


मृत्यूची माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी


त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष अझरबैजानच्या


टेकड्यांमध्ये सापडला होते. यामध्ये अध्यक्ष


रईसी यांच्यासह 9 जण होते.


रविवारी संध्याकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास अझरबैजानजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. रात्रभर त्यांंचा शोध सुरू होता. परिसरात मुसळधार पाऊस, धुके आणि थंडीमुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. यादरम्यान तीन बचाव कर्मचारीही बेपत्ता झाले.


अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन यांच्याशिवाय, हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहपायलट ,  क्रू प्रमुख , सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक होते .