कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथे गुरुवार दिनांक 23/05/2024 रोजी येथील बौद्ध नगर मधील शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुट्टीचा सदुपयोग करत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवरती देखावे बनवले या देखाव्यांमध्ये थ्रीडी चित्रे स्वतः हस्तकलेने बनवली व या थ्रीडी देखाव्यांचे प्रदर्शन भरवले.त्याचबरोबर येथील महिलांनी प्रत्येक घरी बुद्धांच्या जीवनपटावरती रांगोळ्या साकारून अनोख्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने बुद्ध जयंती साजरी केली.सकाळच्या सत्रामध्ये ध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना व पूजा पाठ करून जयंती सोहळ्याला सुरुवात झाली
सदर शालेय मुलांच्या थ्रीडी चित्र प्रदर्शनाला व महिलांच्या रांगोळी प्रदर्शनाला कोल्हापूर येथील इंजिनीयर आयु.प्रथमेश देसाई , वैमानिक आयु.राहुल बनसोडे, आयु.संजय काळे या तसेच अनेक मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.





