मुरगूड मध्ये पाईप गळती ; लाखो लिटर पाण्याची नासाडी.

Kolhapur news
By -

 

            


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क

         

   मुरगूड मधील नगरपालिकेच्या पाईप लाईन मध्ये गळती होऊन लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार येथील महाजन कॉलनी तील नागरिकांनी केली आहे.

  या कॉलनी तील पाईप फुटून  गळती सुरू झाली व पाणी शेजारच्या शेत वडीत घुसले.त्यामुळे पेरणी साठी तयार केलेल्या वाफ्यांचे नुकसान झाले.त्या शेतकऱ्यांनीही तक्रारी केल्या.

     समाजसेवकांनी याची गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरले.

  मे महिन्यात पाण्याची एवढी टंचाई असूनही पाण्याच्या गळती कडे दुर्लक्ष का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  नगरपालिकेने ही याची दखल घेतली असून गळती काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.