कोल्हापूर न्यूज / रोहित धेंडे
प्रचंड मेहनती, कार्य तत्पर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिजीत भोसले..!
आमचे खास मित्र, मार्गदर्शक आणि गाईड म्हणून आम्ही भोसले सरांकडे गेल्या कित्येक वर्षांपासून बघत आलो आहोत. एखाद्या कामाप्रति १००℅ नव्हे २००℅ dedication (झोकून देऊन काम करणे) काय असते, हे खरंच त्यांच्याकडून शिकावे .
एसटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त गेली दीड - दोन महिने आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. अमृत महोत्सवी कार्यक्रम १ जून चा ३ जून ला होणार होता, तो पुन्हा स्थगित होऊन १४ जून ला अखेर संपन्न झाला.
कार्यक्रम पुढे ढकलला, स्थगित झाला, सर्व सेटअप पुन्हा उभारावा लागणार, त्यात अवकाळी पावसाचा भीती इ. गोष्टींचं कोणतंच दडपण किंवा कोणतेही नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते, उलट नव्या उमेदीने पुन्हा तोच कार्यक्रम १४ जूनला त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि प्रभावीपणे आखणी करून पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली आहे !
एखाद्या कार्यक्रमाची आखणी करणे, नियोजन करणे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळवणे आणि सरते शेवटी तो कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणे. यामध्ये सरांचा कोणीही हात धरू शकणार नाही. कारण अश्याप्रकारचे नियोजन करणे हे एका व्यक्तीचे काम नसून सर्वांच्या collective efforts ( सांघिक कामगिरी) चा तो परिपाक असतो, यावर सरांचा प्रचंड विश्वास आहे.
कामाचं श्रेय घेणं, उगीच कार्यक्रमात मिरवण, पुढे पुढे करणं किंवा इतरांना कमी लेखून आपण कसे श्रेष्ठ आहोत, हे वेळोवेळी दाखवणे असला कोतेपणा त्यांच्या स्वभावातच नाही आणि तो आपल्याला कधी दिसणार पण नाही, उलट अतिशय नम्र, संयमी आणि समयसूचकता दाखवून त्यांनी परिपक्वतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे.
आपल्या सहकाऱ्यांशी कसे वागावे, त्यांच्याकडून कसं काम करून घ्यावं ! एखाद्यावर जबाबदारी टाकून, त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला कार्य तत्परतेसाठी प्रेरित कस करावं आणि विशेष म्हणजे काम झाल्यावर " थँक्यू " म्हणणं या गोष्टी कोणत्याही मॅनेजमेंट च्या अभ्यासक्रमात शिकायला मिळणार नाहीत. त्या फक्त सरांच्या सहवासात राहून आम्हाला केवळ शिकता आल्या असे नाही, तर अनुभवता आल्या आणि म्हणून तर मी म्हणालो अभिजीत सर हि व्यक्ती नाही... तर ती एक चालती बोलती संस्था आहे..!



