तिथी नुसार मुरगूड मध्ये शिवजयंती साजरी ; चार हजार झाडे लावण्याचा संकल्प.

Kolhapur news
By -

 

             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


वैशाख शुध्द द्वितीया ही तिथीनुसार येणारी शिवजयंती होय.

    मुरगूड मध्ये अनेक शिवभक्तांनी नगरपरिषदेच्या आवारातील शिवतीर्थावर साजरी केली.

     समारंभाचे प्रमुख पाहुणे होते मुरगूड चे ए पी आय शिवाजी करे.

    उन्हाळा मी म्हणत आहे.सूर्यदेव माघार घ्यायला तयार नाही.उलट तुम्हीं झाडे का लावत नाही असा जणू सवाल सूर्यदेवांने नागरिकांना केला असावा.

    याच जाणिवेतून शिवभक्तांनी आज एकूण चार हजार झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.

     या उपक्रमाचे ए पी आय करे तथा उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

 शिवछत्रपतींनी सुध्दा गडकोटावर झाडे लावण्याची सूचना आपल्या आज्ञापत्रात केली होती.

  या शिवजयंती सोहळ्यात प्रमुख उपस्थित शिवभक्तांची नावे याप्रमाणे .

    सर्जेराव भाट,सोमनाथ यरनाळकर,ओंकार पोतदार,जगदीश गुरव,तानाजी भराडे,रणजित मोरबाळे, अभि मिटके,अरुण मेंडके,प्रकाश पारिष्वाड, आनंदा रामाणे,अरुण मेंडके इत्यादी.