कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
चिमगाव ता.कागल येथील १०५ वर्षाच्या वृध्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
जगातल्या सर्वात मोठ्या अशा भारतीय लोकशाहीचे वस्त्र अशा घट्ट धाग्यांनी बनले आहे.
या माताजीना घरातून मतदान करण्याची सुध्दा सुविधा होती. तशी त्यांना विचारणा सुध्दा करण्यात आली होती.
त्यांनी ती सुविधा नाकारली.
तिने दिलेले उत्तर मार्मिक आहे.
आपण सरकारकडे अनेक मागण्या करतो .नाही मिळाल्या तर मोर्चे काढतो.दंगा करतो.सरकार निवडण्याचा आपला हक्क बजावलाच पाहिजे.
तरच तुम्हाला सरकारकडे हट्ट करण्याचा अधिकार आहे.भिक का मागता ?
ग्रामीण बोलीत तिने लोकशाहीचा गाभाच उलगडून दाखवला.
याउलट एक चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळाले.एक डॉक्टर मतदानाला आले .त्यांनी मतदान केले .तेथील स्वयंसेवकांनी विचारले .
मॅडम कोठे आहेत ?त्यांनाही आणा ना मतदानास.
त्यावर डॉक्टर नी दिलेले उत्तर लोकशाही मूल्यांची च चेष्टा करणारे होते.
ते म्हणाले.
मॅडम ना या मतदानाचा तिटकारा आहे.नाही केले मतदान तर काय बिघडले ? तेवढाच आराम.
या डॉक्टर मॅडम ना औषधाच्या किमती वाढल्या ,कोरोनाची लस वेळेवर मिळाली नाही .सरकारी पैशावर डोळा ठेऊन शस्त्रक्रिया करण्याचा ,झेंडे.घेऊन आंदोलन करण्याचा काय अधिकार आहे ?
सरकार निवडण्यात तुमचा वाटा नाही तर अधिकार मागण्याचा सुध्दा नाही. ती भीक ठरेल.
नोकरीवर असलेल्यांना सुट्टी होती .ते मतदार मतदान करून गेले.कांहीं बांधकाम कामगार सकाळी मतदान करून च कामावर गेले.
नव मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
आजीबाईनी लोकशाही मूल्यांची जाण आपल्या मतदानाने करून दिली .
हेही नसे थोडके.

