जम्मु काश्मीर मधील भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या मुरगूड मध्ये निषेध

Kolhapur news
By -

 

                  


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क

    

   जम्मू काश्मीर मध्ये वैष्णो देवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी गोळीबार केला .त्या मुळे बस दरीत कोसळून नऊजण मृत्युमुखी पडले.३३ जखमी झाले.

  निष्पाप भाविकांवर अतिरेक्यांकडून झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मुरगूड मधील नागरिकांनी व युवकांनी तीव्र शब्दात निषेध केला.

  विशेष म्हणजे दिल्ली येथे मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरु असताना हा हल्ला झाला याचा अर्थ या हल्ल्यातून नव्या सरकारला आव्हान देण्याची अतिरेक्यांची तयारी आहे असा घेतला जातो.

    ही पराभूतांची विकृती असल्याचे मत या निषेध मोर्चात व्यक्त करण्यात आले.