जळगाव :नाशिक शिक्षक मतदार संघाचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक,कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात 'x वर' थेट व्हिडिओच शेअर केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठेआहे? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होणार आहे. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारासाठी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभा झाली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी उपस्थित होते. मात्र सुषमा अंधारे यांच्या आरोपाने आता खळबळ उडाली आहे.


