नवी दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन

Kolhapur news
By -

    

          


नवी दिल्ली : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मध्ये असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शतकोत्तर सुवर्ण जयंती निम्मित खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  करण्यात आले. 

यावेळी खासदार शरदचंद्र पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार शोभा बच्छाव, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार सुनील तटकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार संजय देशमुख, खासदार कल्याण काळे, खासदार बळवंत वानखडे, खासदार स्मिता वाघ, खासदार प्रा.वर्षा गायकवाड, खासदार हेमंत सावरा, आमदार यशोमती ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.