रस्त्यासाठी कंत्राटदारांनी झाडे तोडली ; "नवीन झाडे लावून द्या." ; नागरिकांची मागणी

Kolhapur news
By -

 

               



                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  

      निपाणी ते देवगड हा राज्य  मार्ग आता पूर्ण झाला आहे. रस्त्याचे रुंदीकरण  तसेच काँक्रीटीकरण करताना रस्त्याच्या बाजूची झाडे कंत्राटदारांना तोडावी लागली.रस्ता पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूस पुन्हा दुसरी झाडे पावसाळ्यात लाऊन देऊ असे ठरले होते.त्याप्रमाणे कंत्राटदार कंपनी जितेंद्र ग्रूप्स यांना त्याची आठवण करून देण्यात आली.पण कंपनी व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करण्यात आली.

    रस्त्यासाठी अनेक जुनी  झाडे तोडण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे नवीन झाडे रस्त्याच्या दुतर्फा याच पावसाळ्यात कंपनी ने लाऊन दिली पाहिजेत या मागणीसाठी युवा नागरिकांच्या एका पथकाने कंपनी कार्यालयावर मोर्चा काढला.पोलिस बंदोबस्तात कंत्राटदारांना निवेदन तर दिलेच शिवाय  दिरंगाई व बेफिकिरीचा निषेध म्हणून कांहीं रोपेच देण्यात आली.

   या अनोख्या निषेध प्रकारामुळे कंपनीचे अधिकारी खजील झाले व त्यांनी पहिल्या टप्प्यात ३०० झाडे लावण्याचे मान्य केले.

   वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी वृक्ष लागवडीचे महत्वही पटवून दिले.

  कंपनीचे संपर्क अधिकारी सूरज कोंडेकर यांनी तसे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

    कंपनी तर्फे संदीप पाटील, इंजिनिअर दयानंद चौगुले,दिग्विजय लोकरे,यांनी व आंदोलकांच्या तर्फे सोमनाथ यारनाळकर,जगदीश गुरव,सर्जेराव भाट,तानाजी भराडे,संग्राम डवरी,विनायक ढेंगे,विनायक मुसळे,सुहास देवळे,ओंकार पोतदार,संकेत शहा,रणजित मोरबाळे,गोविंद मोरबाळे,संग्राम ढेरे,सुभाष अनावकर,यांनी चर्चेत भाग घेतला.

  मुरगूड पोलिस स्टेशन चे एपीआय शिवाजी करे यांच्या मार्ग दर्शना खाली या यशस्वी आंदोलनाची सांगता झाली.