कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नगर पालिकेच्या मालकीच्या रस्ता व फूटपाथ वर असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे त्वरित हटवावित अशी नोटीस मुरगूड नगर परिषदेने संबंधितांना दिली आहे .
महाराष्ट्र नगर परिषदा,नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९ नुसार सार्वजनिक रस्ता व फूट पाथवर कोणतेही कुंपण,कठडा,खांब,किंवा तत्सम बांधकाम यास परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारचे अतिक्रमण असेल तर ते त्वरित काढून घेणेत यावे.
तसे न केल्यास कोणतीही आगाऊ सूचना न देता नगरपरिषद आपल्या अधिकारात ती अतिक्रमणे काढून टाकेल.
शासकीय कामात अडथळा आणल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.
नागरिकांच्या वतीने कांहीं समाज सेवकांनी नगरपरिषदे कडे याबाबत तक्रार नोंदवली होती.
अतिक्रमण झाल्याने पादचारी व वाहने यांना अडथळा होईल असे कोणतही रस्त्यावरील व फुटपाथवरील अतिक्रमण नियम बाह्य मानण्यात येईल.ो

