मुरगूड बसस्थानकाच्या परिसरात वृक्षारोपण ; स्थानकाची ही स्वच्छता मोहीम

Kolhapur news
By -





                 काेल्हापूर न्यूज नेटवर्क


            मुरगूड येथील शिवतीर्थ च्या शिवभक्तांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.मुरगूड चे एक हेक्टर जागेतील विस्तीर्ण बस स्थानक हे मुरगूड शहराचे भूषण आहे.समोरच्या बाजूला नगर परिषद व शिवतीर्थ ही  देखणी स्थळे आहेत.रहदारी दिवसभर सुरू असते.मंगळवारी अनेक वाहनांचे पार्किंग बस स्थानकात असते.दुपारची भाकरी खायला येणारे अनेक वाहनधारक,बाजारकरी याच परिसरात गर्दी करत असतात.

      त्यासाठी हा परिसर वृक्ष लागवड करून हिरवा गार करण्याचा संकल्प शिवतीर्थ च्या स्वयंसेवकांनी  सोडला आहे.

   मान्सून दमदार पणाने बरसू लागला असलेने या परिसरात २२५ झाडे लावण्यात येणार आहेत.

    बसस्थानकातील स्वच्छता गृहाचे सुध्दा नूतनीकरण करणे आवश्यकता आहे.प्रवासी आणि बाहेरचे लोक सुध्दा त्यांचा मोफत वापर करतात.पाणी पुरवठा कमि आहे.त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.नगरपरिषदेची सुध्दा नैतिक जबाबदारी असलेने  पाण्याचा पुरेसा पुरवठा व गटारांची स्वच्छता होणे गरजेचे आहे.

  एस टी व्यवस्थापनाने स्वच्छता गृहे नव्याने बांधून घेणे गरजेचे आहे.

     एक सार्वजनिक सुंदर स्थळ म्हणून या परिसराकडे पाहिले पाहिजे व नागरिकांनी स्वच्छता राखण्यात सहकार्य करायला हवे असे स्वयंसेवक एस टी स्थानकाच्या  व्यवस्थापनाकडून आवाहन करण्यात आले आहे.याकामी कुबेर डेव्हलपर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.