कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ज्ञानोबा माऊली तुकाराम... माऊली माऊली
आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील
मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी
मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला
वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणपती ट्रस्टचे विश्वस्तांनी अश्वांचे पूजन करीत श्री
गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच
मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी
गर्दी केली होती.
बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार) यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

