कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चंद्रकांत माळवदे ,मुरगूड यांच्या गोवऱ्या व फुले या पुस्तकास दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल शाहू ग्रुप ,कागलचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी त्यांच्या घरी येऊन अभिनंदन केले.
माळवदे यांच्या साहित्य क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाचा यथोचित सन्मान झाल्या बद्दल त्यांच्या निकटवर्तीय व हितचिंतक यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात आले.
साहित्य व राजकारण यांची सांगड तशी दुर्मिळ असते.त्यामुळे साहित्य प्रेमींनी समरजीत घाटगे यांचे ही कौतुक केले.यावेळी त्यांच्या समवेत दत्तामामा खराडे, अनंत फर्नांडिस,संजय एकल,संतोष गुजर,राजू फर्नांडिस,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वांचे शैलेश माळवदे,डॉ. ऋषीकेश माळवदे,सौ. भारती माळवदे,सौ.दिपाली माळवदे व डॉ.धनश्री माळवदे यांनी घरी स्वागत केले.


