मुरगूड मधील भटक्या कुत्र्यांचा हौदाेस ; बंदोबस्त करण्याची मागणी

Kolhapur news
By -

 

           


                   



                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड शहरातील गल्ली बोळातून आणि मुख्य रहदारी च्या रस्त्यावर सुध्दा भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे.

   शहरातील विविध नागरी वस्तीत( कॉलनी) सुध्दा भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.

    शाळकरी मुले व मुली यांना या कुत्र्यांमुळे त्रास तर होतोच शिवाय भुकेल्या कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यामुळे गंभीर प्रसंगाना तोंड द्यावे लागते.

   रात्रीच्या वेळी या कुत्र्यांचे भुंकणे व रडणे यामुळे नागरिकांना खुपचं त्रास सोसावा लागतो.

    या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिकांनी नगरपरिषदे कडे केली आहे.

 अशा  कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव सुध्दा होता.त्याकडे ही नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.

   नगरपालिका मुकादम बबन बारदेसकर यांनी सुध्दा कुत्र्यांच्या बंदोबस्ताची अत्यंतिक गरज असल्याचे म्हंटले असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी  सामाजिक संघटनांना दिले आहे.

 सर्जेराव भाट,ओंकार पोतदार ,सोमनाथ यरनाळकर इत्यादींनी या कामी पुढाकार घेतला आहे.