मुरगूडच्या व्यापारी नागरी पत संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Kolhapur news
By -

 


            


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी पतसंस्थेने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

    मुरगूड विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.एस पी पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण झाले.

   प्रा.पाटील यांनी पतसंस्थेच्या या शैक्षणिक तथा सामाजिक सेवेबद्दल कौतुकोद्गार काढले.

  या वेळी उप मुख्याध्यापक एस बी सुर्यवंशी यांनी स्वागत केले.संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर,संचालक किशोर पोतदार यांनी मनोगते व्यक्त केली.

    संस्थेचे व्हॉईस चेअरमन प्रकाश सणगर,संचालक प्रशांत शहा, साताप्पा पाटील,शशिकांत दरेकर, हाजी धोंडीबा मकानदार,नामदेवराव पाटील,प्रदीप वेसणेकर,निवास कदम,संदीप कांबळे,व्यवस्थापक सुदर्शन हुंडेकरी,अमित भोई,अशोक चंदनशिवे, वाय ई देशमुख समीर कटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 सूत्र संचालन अनिल पाटील यांनी केले,मारुती टीपुगडे यांनी आभार मानले.