कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वसमत तालुक्यातील शिरळी येथील अल्पभुधारक शेतकरी बालाजी पुंडगे या शेतकऱ्यांस यावर्षी बैलजोडी मिळाली नसल्याने त्यांनी भाऊ , मुलगा तर कधी नातेवाईकाच्या मुलास औताला जुंपून हळद लागवडीची तयारी सुरु केली होती. ही बातमी संपूर्ण राज्यभर पसरली आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याची दखल घेतली .
त्या शेतकऱ्यास बैलजोडी देण्याचा निर्णय घेतला. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत पाठविलेली बैलजोडी पाहून अल्पभुधारक शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. गुरुवारी ही बैलजोडी शेतकरी बालाजी पुंडगे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली.


