महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Kolhapur news
By -

       


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

     लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्रासह 3 राज्यांना येत्या 25 तारखेपासून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा   निवडणुकीची लगबग सुरू होणार आहे.


लोकसभा निवडणूक गत 1 जून रोजी पार पडली. त्यानंतर 4 जून रोजी निकालही लागले. त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा व जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने या प्रकरणी नागरिकाना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सर्वच राज्यांनाही निवडणुकीची आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत .