कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवार दि. 25 जून चा नियाेजित कोल्हापूर जिल्हा दौरा अडचणीत सापडलाआहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच कोल्हापूर बंदची हाक देण्यता आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ करण्याच्या निर्णयासाठी हा इशारा देण्यात आला होता. त्याच बरोबर सर्किट बेंचच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कोल्हापूरकरांनी केला होता. अखेर मुख्यमंत्र्यांचा मंगळवारचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे .

