कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मधील वेदगंगा काठावरील दत्त मंदिर शेजारीच असलेली स्मशानभूमी जीर्ण अवस्थेत आहे.तिचा जीर्णोध्दार व्हावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
स्मशान भूमीतील शेड चे पत्रे मोडकळीस आले आहेत.अंत्य संस्कार बेड चे अँगल सुध्दा सडलेल्या अवस्थेत आहेत.
शहरातील ही मुख्य स्मशान भूमि आहे.त्यामुळे येथे पाणी व वीज यांचा नीयमित पुरवठा आवश्यक आहे.याशिवाय कोल्हापूरच्या धरतीवर गोवऱ्या अथवा लाकडे यांची पण ल होणे आवशक आहे . देणगीदार किंवा सामजिक संस्था यांना आवाहन करून किंवा स्वनिधी तून या साहित्याची सोय करावी .
निवेदनावर सोमनाथ यरनाळकर शिवभक्त सर्जेराव भाट जगदीश गुरव तानाजी भराडे अरुण मेंडके सागर साबळे नंदकुमार खराडे पृथ्वीराज चव्हाण रोहित मोरबाळे अजित कांबळे संकेत शहा अक्षय शिंदे ऋषी भारमल यांच्या सह्या आहेत .

