कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड ते निढोरी रस्त्यावर पुलाच्या अलीकडे दोन फूट पाणी असल्याने बॅरिकेट्स लाऊन रस्ता बंद करण्यात आला आहे.
पाटगाव धरणातील विसर्ग वाढल्याने वेदगं गेची पाणी पातळी वाढली असल्याचे पूर तज्ञांनी सांगितले.नगरपरिषदेचे कर्मचारी व मुकादम बबन बारदेस्कर तसेच शिवभक्त सर्जेराव भाट हे जातीनिशी उभे राहून वाहतूकदार ,विद्यार्थी व मोर्निग वॉक साठी आलेल्या नागरिकांना इशारा देत होते.
पोलिस ठाण्याला व पूर नियंत्रण कक्ष यांना ही कळविण्यात आले आहे.
पाणी उतरेपर्यंत वाहतूक कुर मार्गे वळविण्यात आली आहे.


