कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वेदगंगा दुथडी भरून वाहते .शेतकऱ्यांना भरभरून वरदान देते.आता महापुरात ती बाहेर पडली आहे.
रस्त्यावरून विस्तारलेल्या तिच्या पाण्यातून वहाने जातात.विद्यार्थी,विद्यार्थिनी जातात,सायकली , मोटर सायकली,चार चाकी वाहने,ट्रक ,बसेस यांची वर्दळ सुरूच असते.
बाजार दिवशी आठवड्याची पोटगी घेऊन घरी जाणाऱ्या बाया बापड्या असतात.
यातल्या कोणालाच तिनं दगा दिला नाही की त्रास दिला नाही.
तिच्या या विशालकाय रूपाची परवा काही समाज सेवी युवकांनी महाआरती सुध्दा केली.
त्यातलेच कांहींजण महापुरात उत्स्फूर्त पणे मदतकार्य करत असतात.ना कसली बिदागी ना कसला पुरस्कार.
शिवभावे जीवसेवा या उदात्त हेतूने सर्वाँना मदत करत असतात.त्यांना त्यात खुप मोठे मानसिक समाधान लाभते.लोकांनी त्यांना महापूरातले जलदूत असे म्हंटले आहे.
ग्रुप करून येणाऱ्या विद्यार्थी विदद्यार्थिनींना पाण्याच्या पलीकडे पोचवणे, वृद्ध महिलांना हात धरून पलीकडे पोचवणे,पाण्यात बंद पडलेल्या मोटारसायकल ना ढकलायला मदत करणे,पोलिसांना वेळोवेळी पुराची माहिती देणे,त्यांच्या सोबत राहून पूर परिस्थितीचा सर्वाँना इशारा देणे,साहस देणे इत्यादी कामे हे स्वयंसेवक करत असतात.
यामध्ये प्रामुख्याने सर्जेराव भाट हा युवक नेहमीच अग्रेसर असतो.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सर्जेराव बोलावून घेतो.
कधी कधी पहाटे पाच वाजता पाण्याच्या ठिकाणी जाऊन सर्जेराव व सहकारी व्हिडिओ काढतात,वेळ तारीख घालून सोशल मिडिया वर प्रसारीत करतात.
त्यांच्या मुळे पंचक्रोशीतील नागरिक तर सावध होतात पण प्रशासन सुध्दा बाहेर पडते.
सर्जेराव बरोबर त्याचे सहकारी ओंकार ,जगदीश,तानाजी,संकेत,सुभाष असे अनेकजण अक्षरशः स्वतःला या लोकसेवेत जुंपून घेतात.
नागरिकांच्यात सुध्दा ते लाडके झाले आहेत.कोणाला ही कसलेही व्यसन नाही.समा जसेवेची सुध्दा एक वेगळी नशा असते हे या युवकांनी दाखवून दिले आहे.






