शाळेची बस उलटली ; ६ गंभीर; भेदरलेल्या मुलांचा जिवाच्या आकांताने आरडाओरडा ; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओ नियमानुसार तपासणीचे महत्त्व अधोरेखित

Kolhapur news
By -

 

               

       


                   
कोल्हापूर न्यूज नेटवर्क


बेळगाव : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटल्याने ६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगावच्या गोकाक तालुक्यात घडली आहे.


 गोकाक-पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात घडला. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ही घटना घडली. अपघातग्रस्त बस ३ गावातील विद्यार्थ्यांना घेऊन मरडीमठकडे जात होती. पण रस्त्यात बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे बस उलटली. त्यात ६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस उलटल्यामुळे विद्यार्थी भेदरून गेले होते. जिवाच्या आकांताने त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर  काढण्यास मदत केली.