कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हमीदवाडा गावातून आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल सदाशिवनगर. शाळेतील ज्युनिअर के जी ते इयत्ता सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्त पालखी सोहळयात सहभाग घेतला. हमीदवाडा गावातून निघालेल्या या दिंडीमध्ये मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. माऊली, ज्ञानोबा, तुकाराम जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. गावात ठिक ठिकाणी सुहासिनींनी विठ्ठल रुक्मिणीच्या पायावरती पाणी घालून दर्शन घेत होत्या. मरगुबई मंदिर समोरील मैदानात शालेय विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. मुलींनी फुगड्यांचा फेरा धरला. सर्व मुले दिंडीमध्ये मनमुराद नाचत होती. तिथून पुढे दिंडी गावातील विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात आल्यावर सर्व मुलांनी दर्शन घेतले. आषाढी वारीबद्दल शिक्षकांनी माहिती सांगितली. मुलांना खाऊ दिला. अशाप्रकारे अतिशय उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणामध्ये आषाढी दिंडी सोहळा संपन्न झाला .या कार्यक्रमास गावचे सरपंच कृष्णात बुरटे व मंडलिक गटाचे कार्यकर्ते कृष्णात हासोळे यांचे सहकार्य लाभले .




